VIDEO : मुंजीच्या कार्यक्रमाला 'आयटम डान्स'; माजी आमदारासह २०० जणांवर गुन्हा दाखल - वैशाली कार्यक्रम व्हायरल व्हिडिओ
पाटणा : बिहारच्या लालगंजचे माजी आमदार मुन्ना शुक्ला आणि भोजपूरी अभिनेत्री अक्षरा सिंह यांच्यासोबत २०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुन्ना यांच्या भावाच्या मुलाची मुंज धूमधडाक्यात साजरी केल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला चक्क आयटम डान्सचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच, मुन्ना यांच्या अंगरक्षकाने हवेत गोळीबारही केल्याचे म्हणण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना, दुसरीकडे जबाबदार व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसून येत आहेत...