VIDEO : दिल्लीकडे कूच करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी रुग्णवाहिकेला दिला रस्ता - Farmer protest video
चंदीगढ - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हरयाणा पंजाब राज्यातून शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. त्यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व महामार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. हरयाणातील जींद जिल्ह्यात वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकून पडली होती. मात्र, शेतकऱ्यांनी या रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास रस्ता दिला. आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करताना शेतकरी दिसून आले.