सेंद्रीय शेतीच्या मदतीने पंजाबमध्ये पिकवली स्ट्रॉबेरी - पंजाब स्ट्रॉबेरी शेती व्हिडिओ
हैदराबाद - भूजल पातळीत सातत्याने होणारी घट ही शेतकरी आणि सरकार दोघांच्याही चिंतेचा विषय आहे. यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पारंपरिक शेती सोडून इतर फळ आणि धान्य पिकांकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते. सेंद्रीय शेती हा जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्याचा एक उत्तम पर्याय आहे. लुधियानातील कुहाडामध्ये राहणारे शेतकरी हरदेव सिंग यांनीही सेंद्रीय शेतीची कास धरत सेंद्रीय पद्धतीने स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून दाखवली आहे. हरदेव सिंग यांची स्ट्रॉबेरीची शेती संपूर्ण पंजाबमध्ये प्रसिद्ध झाली आहे. स्ट्रॉबेरीशिवाय त्यांनी पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलकोबीचीही लागवड केली आहे. सुरुवातीला त्यांना या शेतीत अनेक अडचणी आल्या. मात्र, पंजाब कृषी विद्यापीठाच्या मदतीने त्यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत.