राजस्थानातील 'त्रिनेत्र गणेश' जो भक्तांच्या चिठ्ठ्यांमधून मनोकामना करतो पूर्ण - गणेशोत्सव २०२० बातमी
सवाई माधोपूर (राजस्थान) - जिल्ह्यातील रणथंभोर किल्यावर त्रिनेत्र गणपतीचे मंदिर आहे. देश विदेशातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. मंदिरासंदर्भात प्रसिद्ध असलेल्या अनेक कथा, आख्यायिका या मंदिराला विशेष बनवतात. यामुळेच भाविकांची याठिकाणी मोठी गर्दी असते. येथील स्थायी लोक कोणत्याही शुभ कार्याआधी बाप्पांना निमंत्रण पाठवतात. भाविकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणाऱ्या 'त्रिनेत्र गणेश'च्या संदर्भातील ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट.