महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भाविकांचा प्रत्येक नवस पूर्ण करणारा 'तकिया शरीफ' दर्गा - बाबा मोहब्बत शाह दर्गा अंबिकापूर

By

Published : Sep 25, 2020, 7:57 PM IST

अंबिकापूर : छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये असलेला हा दर्गा 'तकिया शरीफ' नावाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे, बाबा मोहब्बत शाह यांच्या समाधीसोबत त्यांच्या पोपटाची कबरदेखील आहे. शाह बाबाच्या दर्ग्यावर येणाऱ्या प्रत्येकाचा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांची बाबांच्या समाधीसह त्यांच्या पोपटाच्या समाधीवरही तितकीच आस्था आहे. त्यामुळेच येथे येणारे भाविक बाबाच्या दर्ग्यासह त्यांच्या पोपटाच्या समाधीवरही चादर चढवतात. ही छत्तीसगडमधील सर्वात जुनी मजार आहे. या ठिकाणी सर्वधर्माचे लोकं येऊन आपले मागणे मागतात, मागणे पूर्ण झाल्यानंतर नवस फेडायला येतात. दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात उरुसाचे आयोजन केले जाते. ज्यात सर्व धर्माचे लोकं मोठ्या संख्येने सहभाग घेतात. त्यामुळे, येथे विविधतेत एकतेचे दर्शनही आपल्याला होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details