आंध्रप्रदेशमध्ये सापडली बनावट अंडी; ग्रामस्थ गेले चक्रावून! - plastic eggs
अमरावती (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशमधील नेल्लो जिल्ह्यात असलेल्या आंद्रावरीपल्ले गावामध्ये बनावट अंडी आढळली आहे. ही अंडी खूप वेळ उकडली तरी फुटत नाही. त्यांचे बाहेरील आवरण इलेक्स्टिकचे आहे. काही व्यापाऱ्यांनी वाहनात येऊन ही अंडी १०० रुपयांमध्ये ३० अंडी ग्राहकांना विकली आहे. हा दर बाजारापेक्षा कमी आहे. अंडी साधारणत: उकडण्यासाठी ५ ते १० मिनिटे वेळ लागत असतो. मात्र, ही अंडी खूप वेळ उकडत असल्याने गावातील काहीजणांना संशय आला. अंडी फोडली तरी त्यामधून बलक योग्यपणे बाहेर आला नाही. अंडी उकडल्यानंतर त्याचा रंग काळा झाल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात आले. बनावट अंड्याबाबत प्रशासन तपास करत आहे.