Video : खासगीकरणावरील राहुल गांधींच्या आरोपांवर स्मृती इराणींचा पलटवार - राहुल गांधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पलटवार केला आहे. 'भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की कोणतीही मालमत्ता विकली जाणार नाही. त्यांची कमाई केली जाईल. जर राहुल गांधी मुद्रीकरणाचा हेवा करत असतील तर त्यांनी हे सांगावे की 2006 साली जेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकार विमानतळाचे खासगीकरण करत होते, तेव्हा राहुल आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब देश विकत होते का?', असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली. या दरम्यान, इराणी यांनी प्रश्न विचारला की जेव्हा ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या कमाईनंतर 8 हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या तिजोरीत टाकण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ते राज्य विकत होते का? इराणींचा काँग्रेसला सवाल - खाजगीकरण धोरणाबाबत राहुल गांधींच्या टीकेवर स्मृती इराणी म्हणाल्या, की 'राहुल यांना असे म्हणायचे आहे का की जोपर्यंत काँग्रेसला खाजगीकरणात किट बॅग मिळत नाहीत तोपर्यंत ते बरोबर नाही?' देशातील तरूणांचा रोजगार सुरक्षित - जर रोजगार संपला असेल तर तो राहुल गांधींचा संपला आहे, देशातील तरुणांचा नाही. ते सुरक्षित आहेत, असेही इराणी म्हणाल्या.
Last Updated : Aug 25, 2021, 8:40 AM IST