विशेष मुलाखत : राजदच्या 25 व्या स्थापना दिनानिमित्त तेजस्वी यादव यांच्याशी बातचीत - तेजस्वी यादव मुलाखत
जनता दलात फूट पडल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरले आणि त्यांनी रातोरात 'राष्ट्रीय जनता दल' नावाचा नवा राजकीय पक्ष काढून, आपली पत्नी राबडीदेवी यांना बिहारचे मुख्यमंत्री केले. आज 'राष्ट्रीय जनता दल' पक्षाचा 25 वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित भेलारी यांनी राजद प्रमुख आणि विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांची विशेष मुलाखत घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.