महाराष्ट्र

maharashtra

'आत्मनिर्भर भारत'चा पहिला टप्पा हा उद्योगांना नवसंजीवनी - यमाजी मालकर

By

Published : May 13, 2020, 11:11 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर काढणे आणि अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणणे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. पॅकेजची फोड करत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विविध क्षेत्रांना कशा पद्धतीने पॅकेज दिले जाणार आहे, याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. आज पहिल्या टप्प्यात सुमारे 6 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. या टप्प्यात साधरणत: रोख भांडवल कसे उपलब्ध राहील याकडे भर दिसून आला. तसेच कुटीर, लघु व मध्यम उद्योगांची व्याख्या आणि निकष बदलण्याचा आणि 200 कोटी रुपयांच्या सरकारी कंत्राटांमध्ये परकीय निविदा राहणार नाही, हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याचा 'आत्मनिर्भर भारत'साठी मोठा लाभ होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थतज्ज्ञ यमाजी मालकर यांनी दिली. पाहुयात आजच्या टप्प्याबाबत मालकर यांनी केलेले विश्लेषण...

ABOUT THE AUTHOR

...view details