दक्षिणेतील 'द रियल सिंघम' मानव तस्करांचा कर्दनकाळ, या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा अमेरिकेत डंका' - महेश भागवत लेटेस्ट न्यूज
हैदराबाद - दक्षिणेतील तमाम नागरिकांमध्ये महेश भागवत या पोलीस अधिकाऱ्याची प्रचंड क्रेझ आहे. मराठी नागरिकांना महेश भागवत यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. आपल्या धडाकेबाज कामगिरीनं महेश भागवत यांनी दक्षिणेतील गुन्हेगारांमध्ये धडकी भरवली आहे. माय मराठीच्या या सुपूत्राने मानवी तस्करी रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी मानवी तस्करी विरोधात केलेल्या कामगिरीची दखल अमेरिकेनेही घेतली आणि महेश भागवत यांच्या कर्तृत्वाचा झेंडा साता समुद्रापार फडकला. जाणून घेऊया त्यांच्या या कार्यावर प्रकाश टाकणारी विश्वास दुतोंडे यांनी घेतलेली ही लक्षवेधी विशेष मुलाखत . . .
Last Updated : Sep 4, 2021, 8:33 AM IST