'बा पांडुरंगा! पुन्हा तो पंढरीचा सोहळा पाहू दे' - Ashadhi Ekadashi Pandharpur 2021
पंढरपूर (सोलापूर) - आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी सोनियाचा दिन. सर्व जाती जमातींना भक्ति आणि प्रेमाच्या बळावर परमेश्वर दर्शनाचा सोपा सोपान वारकरी संप्रदायाने आणि संतांनी घालून दिला आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंढरपुरात सपत्निक शासकीय महापूजा केली. यावेळी 'हे विठ्ठला कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर आणि आम्हाला पूर्वीप्रमाणे आषाढी वारी, वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली पंढरी पाहू दे' असं साकडं पांडुरंगा चरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घातलं. यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने घेतलेला हा वारीचा विशेष आढावा...
Last Updated : Jul 20, 2021, 7:32 PM IST