Exclusive : बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारशी चर्चा सुरू - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सुरत (गुजरात) - देशात जागतिक दर्जाचे 75 रेल्वे स्थानके बांधली जाणार आहेत. काश्मीर खोऱ्यापर्यंत उत्तमोत्तम रेल्वे सेवा मिळावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. आम्ही हे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करू, जेणेकरून भारताच्या विकाम कामांमध्ये रेल्वे गेम चेंजर ठरले, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारशी चर्चा सुरूच आहे. 2024 पर्यंत अहमदाबाद ते उमरगामपर्यंत बुलेट ट्रेनसाठीच्या पायाभूत सुविधा पूर्ण होतील, असा विश्वास जरदोश यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचित करताना व्यक्त केला.
Last Updated : Oct 23, 2021, 4:29 PM IST