महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शाहीन बागच्या 82 वर्षीय आजी बिलकिसनी पटकावले अमेरिकन टाईम नियतकालिकात स्थान - टाईम मासिकाच्या सर्वाधिक प्रभावशाली 100 व्यक्ती न्यूज

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Sep 24, 2020, 10:57 PM IST

अमेरिकन टाईम मासिकाच्या 100 सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहीन बागच्या 82 वर्षीय आजी बिलकिस यांचे नाव समाविष्ट झाले आहे. 'शाहीन बागेत आम्ही 100 दिवस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध नोंदविला होता. पण नंतर हा निषेध थांबवण्यात आला,' असे या आजींनी सांगितले. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलनात सामील होणार का, असे विचारले असता, कोरोनामुळे पसरलेली आजाराची साथ संपल्यानंतर याविषयी निर्णय घेऊ, असे त्या म्हणाल्या. आताच याबद्दल काही सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची आहे आणि त्यांच्याशी नागरीकरण दुरुस्ती कायद्याबद्दल बोलण्याची इच्छा आहे, जेणेकरून हा प्रश्न निकाली निघू शकेल, असे त्यांनी असे सांगितले. थंडीच्या रात्री, मुसळधार पावसात त्यांनी आपला निषेध कसा नोंदविला हेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details