उत्तराखंड प्रलय- हत्ती अडकला नदीच्या पूरात, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने केली सुटका - उत्तराखंड प्रलय
हल्दानी (उत्तराखंड)- गौला नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जलस्तर वाढल्याने नदीकाढच्या अनेक गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान अनेक जनावरे दगावली आहेत. एक हत्ती अचानक नदीचा जलस्तर वाढल्याने नदीच्या मधोमध अडकल्याचे दिसून येत आहे. याची माहिती मिळाल्यावर वन विभागाच्या टीमने त्याची सुटका केली.