VIDEO : बिहारमध्ये हत्तीचा उन्माद; ट्रॅक्टरची ट्रॉली पलटवली - हत्ती ट्रॅक्टर ट्रॉली पलटली
पाटणा : बिहारच्या सिवानमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान एका हत्तीने उन्माद माजवला होता. महाराजगंजमध्ये सायंकाळच्या वेळी शिवयात्रेसाठी लोकांनी गर्दी केली होती. या यात्रेसाठी हत्ती आणि घोडेही आणण्यात आले होते. यातच एका हत्तीचा 'मूड' बिघडल्यामुळे त्याने तोडफोड करण्यास सुरुवात केली. यातच रस्त्याच्या कडेला असलेली एक ट्रॅक्टर ट्रॉलीही या हत्तीने पलटवली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. काही वेळानंतर या हत्तीला शांत करण्यात यश मिळाले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला...