डॉ. रवी कन्नन यांचे कर्करुग्णांसाठी अथक परिश्रम, त्यांचा सेवाभाव हे 'परमेश्वराचे प्रेम' असल्याची रुग्णांची भावना - Dr Ravi Kannan in assam news
हे आहेत कर्करोगावर इलाज करणारे एक विशेष डॉक्टर. त्यांच्या सेवेकडं त्यांचे रुग्ण 'परमेश्वराचं प्रेम' या रुपात पाहतात. (स्लग –1 ) डॉ. रवी कन्नन असं त्यांचं नाव असून ते दक्षिण भारतातले कर्करोग तज्ज्ञ आहेत. 2007 साली ते आसामला गेले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दृष्टिकोनातून आसाम ही दहशतवाद आणि सतत पूर येणारी भूमी होती. त्यामुळे त्यांनी डॉ. कन्नन यांना आसामला जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. कन्नन यांनी 70 हजार हून अधिक रुग्णांवर उपचार केलेत. त्यांनी असंख्य रुग्णांना फक्त जीवनच दिलं नाही तर, त्यांना या जीवघेण्या आजारावर मात करून जिवंत राहण्याचा भरवसाही दिला.
Last Updated : Oct 6, 2020, 1:55 PM IST