महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ओडिशातील 'हे' डॉक्टर १८ वर्षापासून करतायत केवळ १० रुपयात रुग्णसेवा - शिशिर कुमार साहू न्यूज

By

Published : Feb 3, 2021, 7:26 AM IST

ते तपासणी करतात. गरज असली तर इंजेक्शन देतात. आवश्यक ती औषधे देतात आणि फी म्हणून फक्त दहा रुपये घेतात. फक्त दहा रुपयात या डॉक्टरांकडे आजार बरा होतो. उलट तुमच्याकडे देण्यासाठी दहा रुपये जरी नसतील तर ते मोफत उपचार करतात. एवढचं नाही तर घरी जाण्यासाठी पैसे नसतील तर ते सुद्ध स्वत:च्या खिशातून देतात. ही गोष्ट आहे ओडिशाच्या बरगड जिल्ह्यातील सोहेला गावात राहणारे ७० वर्षीय शिशिर कुमार साहू यांची. गरीब रुग्णांसाठी ते देवदूत बनले आहेत. साहू यांच्याकडे पाहिले की, आजूबाजूच्या फसव्या आणि स्वार्थी जगात आजही निस्वार्थपणा शिल्लक असल्याची प्रचिती येते. साहू यांच्याकडे पाहिले की आजही निस्वार्थपणा शिल्लक असल्याची प्रचिती येते.

ABOUT THE AUTHOR

...view details