भारत-चीन सीमावाद फक्त चर्चेने सुटणार: लेफ्टनंट जनरल डी. एस हुड्डा - भारत-चीन सीमेवर तणाव न्यूज
मुंबई - लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयला सुत्रांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमिवर 'ईटीव्ही भारत'ने सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा यांच्याशी चर्चा केली, पाहा संपूर्ण बातचित...