VIDEO : 'राम मंदिर ट्रस्टची स्थापना निवडणुका डोळ्यापुढं ठेवून नाही, हा तर..' - देवेंद्र फडणवीस राम मंदिर विषय
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज 'श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र'ची स्थापना केल्याची घोषणा लोकसभेत केली. हा निर्णय दिल्ली विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घेण्यात आला आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. या आरोपाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना उत्तर दिले आहे. राम मंदिर आमच्या श्रद्धेचा विषय असल्याचे ते म्हणाले, पाहा संपूर्ण व्हिडिओ