VIDEO पुरात पूल ओलांडण्याचे धाडस आले जीवावर, तरुणाने 'असे' वाचविले प्राण - विदिशा बीना नदी
भोपाळ - गेल्या चार दिवसांपासून विदिशा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्या-ओढ्यांना पूर आला आहे. शुक्रवारी पठारी खुरई रोडवर दलपत घाट येथे बीना नदीचा पुल ओलांडताना तरुण पुराच्या पाण्यातून वाहून गेला. यावेळी उपस्थित लोक त्याचा व्हिडिओ तयार करण्यात गुंग होते. पुल ओलांडू नये, असे लोक त्या तरुणाला ओरडून सांगत होते. मात्र, तरुण ऐकायला तया नव्हता. तरुण पुलापर्यंत पोहोचला, पण पुराच्या पाण्यामुळे त्याचा तोल ढासळला. तरुण पुलाचे रेलिंग धरून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. पुराच्या पाण्यात कसबेसे पोहत त्याने स्वत:चे प्राण वाचविले आहेत.
Last Updated : Aug 6, 2021, 6:13 PM IST