शाकाहारी मटण; मशरुम 'रगडा-खुखडी' - देशी मटण
झारखंड - तुम्ही मांसाहारी नाहीत, परंतू मटणासारखा आस्वाद घ्यायचा आहे? तर या झारखंडला. इथे तुम्हांला मिळणार वेज मटण...होय.. अगदी बरोबर ऐकलात तुम्ही... हे आहे शाकाहारी मटण....खरं तर हा शाकाहारी पदार्थ मशरूम प्रजातीचा आहे.. ज्याचं नाव आहे रूगडा आणि खुखडी. रूगडा हे सामान्यत: पावसाळ्यातच मिळतो, ज्याठिकाणी सालचे झाड किंवा मैदान आहे. प्रत्येक हंगामात रूगडा मिळत नाही. झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ या भागात हा सामान्यत: आढळतो. हा रगडा वर्षातून एकदाच मिळतो आणि फक्त पावसाळ्यातच मिळतो. याची विक्री 80 रूपये पाव दराने केली जाते. हे मातीत उगवतं. जे लोक मांस खात नाहीत त्यांच्यासाठी उत्तम पदार्थ आहे. मटण-चिकन सामान्यत: नेहमीच खातो. परंतू हे हंगामी असल्यानं लोक याला जास्त पसंती देतात. ही चांगली गोष्ट आहे, कारण हे शु्द्ध आणि नैसर्गिक आहे. यात कोणतीही भेसळ नाही आणि हे चवदारसुद्धा आहे. जाणून घेऊयात हा विशेष रिपोर्ट..
Last Updated : Jul 8, 2021, 9:09 AM IST