ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर लाल किल्ल्यावरून सद्यस्थितीचा आढावा - लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांचा कब्जा
26 जानेवारीला (मंगळवारी) शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीला हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर कब्जा मिळवत निशाण साहीब ध्वज फडकावला. लाल किल्ल्यावर पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली. सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसानही झाले. या घटनेनंतर ईटीव्ही भारतने लाल किल्ल्यावरून सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे.