कोरोना: फॅशन डिझाईनिंगची परीक्षा अर्ध्यावर सोडून 'ती' ईटलीतून माघारी आली - corona outbreak
नवी दिल्ली - चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना विषाणूने जगभरामध्ये हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे १०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इटलीला फॅशन डिझाईनिंगचा अभ्यास करायला गेलेली दिल्लीची विद्यार्थीनी कोरोनाच्या भीतीमुळे परीक्षा अर्ध्यावर सोडून भारतात परतली आहे. तेथील परिस्थिती भयंकर असल्याचे तिने सांगितले. 'ईटीव्ही भारत'ने सोनालिका अग्रवाल या विद्यार्थीनीची मुलाखात घेतली आहे. पाहा संपूर्ण मुलाखत