स्वारगेट बस स्थानकावर परतीच्या प्रवाशांची गर्दी - Pune curfew
पुणे - राज्यात आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना बाहेर पडता येणार नाही. या कडक संचारबंदीत सार्वजनिक वाहतूक सुरू असणार आहे. परंतु, फक्त अत्यावश्यक काम करणाऱ्या नागरिकांनाच प्रवास करता येणार आहे. आज संध्याकाळपासून कडक संचारबंदी लागू होणार असल्याने, पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकात, गावाला परत जाणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. स्वारगेट बस स्थानकातून दररोज 100 बसेस विविध ठिकाणी ये-जा करत असतात. दररोजच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे.
Last Updated : Apr 14, 2021, 5:16 PM IST