कोरोना वॉर्डमध्ये घुमले बासरीचे स्वर, कोविड रुग्णाने वातवरण केल सकारात्मक - नवी दिल्ली सकारात्मक बातमी
नवी दिल्ली - देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे. सर्व लोक चिंतेने ग्रासले आहेत. यातच गाजियाबादच्या कौशांबी येथील यशोदा रुग्णालयातील सकारात्मकता दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे. यात कोरोना बाधित व्यक्ति रुग्णालयात बासरी वाजवत आहे. याबासरीच्या मधूर सुरावटींनी रुग्णालयातील वातावरण बदलले. या व्यक्तिचे नाव पीयूष शर्मा असून ते बंगळूर येथील आयटी प्रोफेशनल आहेत. पीयूष त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी घरी गेले असता, त्यांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले. आता पीयूष रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे ते लवकरच बरे होण्याची शक्यता आहे.