भारती सिंहला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक ; 'ईटीव्ही'ने घेतला आढावा... - भारती सिंह लेटेस्ट न्यूज
मुंबई - बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांच्या संदर्भात 'ड्रग्ज सिंडिकेट तपास करत असलेल्या एनसीबीने कॉमेडियन भारती सिंहला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली. शनिवारी सकाळी एनसीबीने भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचीया यांच्या अंधेरी लोखंडवाला येथील घरी धाड टाकली होती. तेव्हा त्यांच्या घरातून 86 ग्राम गांजा हस्तगत केला होता. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण परिस्थितीचा आढावा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी घेतला आहे.