मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 7 मार्चला अयोध्या दौरा - Sanjay Raut to visit Ayodhya
शिवसेना नेते संजय राऊत आयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ईटीव्ही भारतने त्यांची खास मुलाखत घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 7 मार्चला अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली. हा दौरा भक्ती आणि विश्वासाचा असून याला राजकीय रंग देऊ नये, असेही संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असंख्यक शिवसैनिक आणि खासदारही आयोध्याला येणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.