VIDEO : हैदराबादेत काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री - काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान बाचाबाची
हैदराबाद : तेलंगाणाची राजधानी हैदराबादमध्ये आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांदरम्यान चांगलीच बाचाबाची झाल्याचा प्रकार शुक्रवारी बघायला मिळाला. शहरातील धरना चौक येथे महागाईविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांसोबत आंदोलकांची धुमश्चक्री उडाली आणि यादरम्यान त्यांच्यात बाचाबाची झाली. आक्रमक कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवताना पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. दरम्यान, यावेळी पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना ताब्यातही घेतले.