या गोशाळेत गायींना मिळते 'व्हियापी ट्रिटमेंट'! - चुरू आलिशान गोशाळा बातमी
जयपूर - देशभरात गोरक्षेसाठी अभियान चालवले जात आहे. गोवंश संरक्षणासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम देखील केले जाते. राजस्थानच्या चूरू शहराजवळ असलेली 'श्री बालाजी गोशाळा' ही संस्था गोवंश संरक्षणाचे उत्तम उदाहरण आहे. या गोशाळेत त्यांच्या राहण्या-खाण्यासह विविध सुख-सोयींवर विशेष लक्ष दिले जाते. या ठिकाणी गायींना आरओचे गोड पाणी आणि इस्त्राईलच्या तंत्रज्ञानापासून तयार झालेला चारा सुद्धा दिला जातो.