VIDEO : 'या' शहरात आहे इतकी गर्मी; की वाळूतही भाजला जातोय पापड - Papad roasted in soil video
जयपूर - राजस्थानच्या चुरू शहरामध्ये तापमानाने अर्धशतक पार केले आहे. आपल्या तापमानासाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेले चुरू शहर हे मंगळवारी देशातील सर्वात उष्ण, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर ठरले. या शहराबाबत बोलली जाणारी आख्यायिका म्हणजे, येथील वाळूवर पापडही भाजला जातो. हे खरं आहे का, याचा आम्ही आढावा घेतला आहे. यामध्ये आपल्यासोबत आहेत, लोहिया महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जे.बी. खान. पाहूयात 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट...