डायना अवॉर्डने सन्मानित लहानशा चंपाची संघर्ष कथा...
गिरिडीह (झारखंड) - जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावात राहणारी चंपा कुमारी आधी एका खाण क्षेत्रात काम करायची. एके दिवशी तिला कैलास सत्यार्थी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्याने विचारले असता तिने घरच्या आर्थिक परिस्थितीबाबत सांगितले. यानंतर तिला बालमजुरीतून मुक्त करत शाळेत पाठवण्यात आले. इथूनच चंपाने बालहक्कासाठी काम करणे सुरू केले. तिच्या या कार्याची दखल घेत ब्रिटिश सरकारने तिला डायना अवॉर्डने सन्मानित केले.