आसामच्या जोरहाटमधील धार्मिक एकता जपणारी स्मशानभूमी - जोरहाट स्मशानभूमी व्हिडिओ
हैदराबाद - एखाद्याचा मृत्यू झाला की, त्याला त्याच्या धर्माप्रमाणे शेवटचा निरोप दिला जातो. आसामच्या जोरहाट जिल्ह्यात अंत्यविधीचे असे एक ठिकाण आहे ज्याला धर्माच्या आणि जाती-पातीच्या सीमा नाहीत. धार्मिक एकतेचे ठिकाण म्हणून या जागेकडे पाहिले जाते. याठिकाणी हिंदू, मुस्लिम अन् ख्रिश्चन धर्मातील लोकांचे अंत्यसंस्कार केले जातात. हिंदूंचा अग्नीदाह केला जातो आणि मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीयांना दफन केले जाते. गेल्या कित्येक दशकांपासून या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. जोरहाटच्या गोरजान गावात असलेल्या एका जमिनीच्या तुकड्यावर सर्व अंत्यविधी केले जातात. अशा प्रकारे एकत्र अंत्यविधी करण्याला स्थानिक नागरिकांचाही विरोध नाही. जोरहाट शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण गेल्या ९ दशकांपासून धार्मिक एकतेच प्रतिक बनले आहे.