दुचाकीस्वारांना उडवून चारचाकी पसार; पुढे रस्ता नाही म्हणून रिव्हर्समध्ये आणली गाडी.. पाहा व्हिडिओ! - यमुनानगर अपघात व्हिडिओ
चंदीगड : हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यात झालेल्या एका अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये एक भरधाव चारचाकी दुचाकीस्वारांना उडवताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतरही ही गाडी थांबत नाही, तर तशीच पुढे निघून जाते. काही वेळाने हीच गाडी रिव्हर्समध्ये माघारी येताना या व्हिडिओत दिसून येत आहे. या दुर्घटनेत दुचाकीवर असणारे दोघे जखमी झाले आहेत. तर, सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चारचाकीचा शोध सुरू आहे...