Aslam Sheikh Resolution 2022 : 'मुंबईमधून लवकरच जलवाहतूक सेवा सुरु करण्याचा संकल्प' - कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांचा नवीन वर्षे संकल्प
मुंबई - गेल्या दोन वर्षात सर्वच विभागांमध्ये त्रास झालेला पाहायला मिळाले. केवळ कोविडच्या प्रादुर्भावामुळे नाही तर नैसर्गिक संकटही गेल्या दोन वर्षात पाहायला मिळाली. त्यामुळे देवाकडे हीच प्रार्थना आहे, की पुढच्या वर्षी जास्तीत जास्त काम करता येऊन लोकांना मदत करता यावी. पुढील वर्षी नवीन टेक्स्टाइल पॉलिसी आणण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जलवाहतूक सेवा वाढवण्याचा विचार केला जात आहे. ठाणे, नवी मुंबई येथे मुंबईतून जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना राज्य सरकारची असून त्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे. तसेच विकास कामामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांना राज्य सरकारकडून पूर्ण मदत केली जात आहे. कोणत्याही मच्छीमारांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी राज्य सरकार घेत आहे, अशी भावना कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली आहे.