उडुपीच्या तरुणांची कमाल! नदीतून थेट आकाशात झेपावतं हे 'सीप्लेन' - उडुपी सी-प्लेन न्यूज
हैदराबाद - साधारणपणे आपण पाहतो, की विमानांच्या उड्डाणांसाठी विशेष रन-वे तयार करण्यात आलेला असतो. मात्र, जर रन-वे ऐवजी पाण्यातून थेट विमान हवेत नेले तर? कर्नाटकमधील उडुपीच्या काही तरुणांनी हे अनोखे सी-प्लेन बनवले आहे. हे मायक्रो-लाईट सी प्लेन पाण्यातून थेट टेक-ऑफ करत हवेत जाते आणि पुन्हा पाण्यावरच लँड होते. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत या घोषणेपासून प्रेरित होऊन या तरुणांनी हे सी-प्लेन बनवले आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी गुजरातमध्ये देशातील सर्वात पहिल्या सी-प्लेनचे अनावरण केले होते. नर्मदा नदीवरुन उडणारे हे सी-प्लेन विदेशातून आयात करण्यात आले आहे. मात्र, उडुपीच्या तरुणांनी बनवलेले सीप्लेन हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे आणि तेही तितक्याच दिमाखात शंबवी नदीवरुन उड्डाण घेते. या नदीकिनारी असलेल्या नादिकुद्रु गावातील पुष्पराज या तरुणाने हे सी-प्लेन बनवले आहे.