या लहानशा गावातील तिरंदाजांनी रोवलाय अटकेपार झेंडा, एकदा बघाच... - तिरंदाजी स्पर्धा
डुंगरपुर (राजस्थान) - आदिवासीबहुल असलेल्या डूंगरपूर जिल्ह्यातील बिलडी या गावाची धनुर्धरांचे गाव म्हणून ओळख आहे. या गावात १ आंतरराष्ट्रीय, ३० राष्ट्रीय आणि २० हुन जास्त राज्यस्तरीय स्पर्धेत पदकप्राप्त करणारे तिरंदाज आहेत. मुलांसोबतच मुलींनीही या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. येथील मुलांना आंतरराष्ट्रीय तिरंदाज आणि भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक राहिलेल्या दिवंगत जयंतीलाल ननोमा यांनी प्रशिक्षण दिले.