आशिया खंडातील सर्वात वयोवृद्ध हत्तीबाबत तुम्हाला माहिती आहे का... - oldest asaitic elephant
बिस्वनाथ (आसाम) - बिजुली प्रसाद हे कोण्या व्यक्तीचे नव्हे तर, एका हत्तीचे नाव आहे. हा आशिया खंडातील सर्वात वयोवृद्ध हत्ती असून त्याचे वय ८६ वर्ष आहे. हा हत्ती आसामच्या बिस्वनाथ जिल्ह्यातील बेहाली टी इस्टेटकडे आहे. जवळपास ५२ वर्षांपूर्वी या हत्तीला विलियमसन मॅगोर चहा मळ्याने विकत घेतलं होते. तेव्हा तत्कालीन ब्रिटिश अधिकारी जॉन ऑलिवर यांनी त्याचे नाव बिजुली प्रसाद असे ठेवले. यानंतर, त्याला सन २०१८मध्ये बेहाली टी इस्टेटमध्ये आणण्यात आले. बिजुली प्रसाद हा अल्पावधीतचं विलियमसन मॅगोर कंपनीचे प्रतीक बनला आहे. पाहुयात एक रिपोर्ट -