VIDEO : जोरदार वादळानं बांगलादेशी मालवाहू जहाजाची दिशा भरकटली - विशाखापट्टनम किनारा जहाज
बांगलादेशी मालवाहू जहाजाचा नांगर गहाळ झाल्याने दिशाहीन होऊन ते विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर येऊन धडकले. बंगालच्या महासागरात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोरदार वादळ तयार झाले आहे. त्यामुळे जहाजाचा नांगर गहाळ झाला. आज(मंगळवार) मध्यरात्री दिशाहीन अवस्थेतेतील जहाज विशाखापट्टणम किनाऱ्यावर धडकले. त्यानंतर कोस्टगार्डच्या मदतीने जहाज पुन्हा खोल समुद्रात नेण्यात आले.