दृष्टीहीन मुलांसाठी आशेचा किरण ठरलेले 'बाबा सूबा सिंह'
बरनाळा/पंजाब - ज्याचा कुणी नाही त्याचा देवच वाली असतो असे म्हणतात. मात्र, पंजाबच्या नारायणगड सोहिया गावातील दृष्टीहीन मुलांच्या निवारा गृहाचे प्रमुख असलेले बाबा सूबा सिंह हे अनेक मुलांसाठी आशेचा किरण ठरले आहेत. ते स्वत: दृष्टीहीन आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक दृष्टीहीन मुलांसाठी काम करण्याचे ठरवले. त्यांनी सन २००० मध्ये असहाय्य, दृष्टीहीन अनाथ, मतिमंद मुलांच्या मदतीसाठी एका आश्रमाची सुरुवात केली. त्यांनी रेल्वे स्थानक, बस स्थानक, रस्त्यावर असलेल्या मुलांना आपल्या आश्रमात आणले आणि त्यांची देखरेख सुरू केली. आज त्यांच्या कुटुंबात जवळपास ५० मुलं आहेत. गुरद्वारा चंदुआणा साहिब म्हणूनही ओळखले जाते.