व्हिडिओ : काय आहे अयोध्या टायटल सूट विवाद, जाणून घ्या प्रकरण - अयोध्या विवाद सर्वोच्च न्यायालयात
अयोध्येतील 2.77 एकर वादग्रस्त भूमीवर सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्येच्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद विवादाला अनेक पैलू आहेत. या निर्णयाआधी ब्रिटिशांच्या काळापासून वाद सुरू असलेले हे प्रकरण काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, या खटल्यासंदर्भात आतापर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडल्या, प्रकरण अधिकच कसे गुंतत गेले हेही कुतूहलपूर्ण आहे. ईटीवी भारत या वादग्रस्त प्रकरणातील महत्त्वाच्या घटनांची माहिती वर्षवार देत आहे.