अनंतनागच्या कोकेरनागमध्ये आहे आशियातील सर्वात मोठी 'ट्राउट मत्स्य शेती' - ट्राउट मत्स्य शेती
श्रीनगर : नैसर्गिक धबधब्यांच्या अमुल्य ठेवीसाठी कश्मीरला सर्वश्रेष्ठ स्थान देण्यात आलं आहे. या धबधब्यांचं थंड पाणी वेगवेगळ्या माश्यांच्या प्रजातीसाठी सगळ्यात जास्त अनुकुल आहे. या माशांपैकी इंद्रधनुष ट्राउट मासा हा अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा मासा आहे. हा मासा कश्मीरच्या धबधब्यांमध्ये आढळून येतो. ट्राऊट एक विदेशी जातीचा मासा आहे. ज्याची चव मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. या माश्याच्या संगोपनासाठी कश्मीरचे वातावरण पोषक आहे. १८८९ मध्ये ब्रिटिश नागरिक फैंक जॉन मिशेल यांनी कश्मीरमध्ये या माशाची अंडी आणून संगोपनाची सुरूवात केली होती. दक्षिण कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनागमध्ये असलेले सर्वात मोठे टाऊट मत्स्य शेती केंद्र सगळ्यांचं मुख्य आकर्षण आहे. हे ट्रउट माश्याचे प्रजनन केंद्र जवळजवळ ३८ एकरमध्ये परसले आहे..