खाकी वर्दीतील अन्नदाता; कोरोना काळात भुकेल्यांचा पोषणकर्ता - Chhattisgarh police news
कोरोनासारख्या भयंकर महामारीत पोलीस चौकाचौकांमध्ये पहारा देत लोकांना सुरक्षित राहण्याचे सल्ले देतात. रात्रीच्या वेळी गस्त घालतात जेणेकरून आपण सुखाने झोपू. एवढच नाही तर कोणी उपाशी झोपू नये याची काळजीही पोलीस घेतात. छत्तीसगडच्या रायपूरमधील गोकूळनगरमध्ये प्रयास शाळेत पोलिसांनी उपाशी लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. या कामात प्रयास शाळेची मुलेही पोलिसांना मदत करत आहेत. इथं गरजू आणि उपाशी लोकांसाठी जेवण बनवलं जातं. १० पोलीस कर्मचारी जेवण तयार करण्यापासून जेवण बांधण्यापर्यंतचे सगळं काम करतात. जेवण बनवताना सामाजिक अंतर आणि जेवणाच्या गुणवत्तेची काळजी घेतली जाते. हातमोजे घालूनच काम केलं जाते.