कन्नौजमधील आजीबाईंचे बेट झाले पर्यटन स्थळ - कन्नौज व्यावसायिक महिला किरण राजपूत
हैदराबाद - खेडे गावातील एक दहावी शिकलेल्या महिले आपल्या कल्पनेतून लाखो रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. कन्नौजमधील गुंदहा गावातील किरण राजपूत यांनी हि किमया केली आहे. 68 वर्षीय किरण वर्षाला 25 लाख रुपये कमवत आहेत व त्यांनी अनेकांना रोजगारही दिला आहे. त्यांनी १२ एकर जमिनीवर तलाव आणि त्यात मधोमद एक बेट तयार केले आहे. हे बेट सध्या कन्नौजच्या लोकांसाठी एक पर्यटन स्थळ झाले आहे. तलावातील मासे आणि बेटावरील फळे किरण यांना पैसा मिळवून देत आहेत.