VIDEO हत्तीकडून नाकाबंदी! महामार्गावर अडविली केळी वाहून नेणारी पिकअप - elephant eating banana viral video
बंगळुरू - केळी घेऊन जाणारा बोलेरो पिकअप हत्तीने अडविल्याची घटना बन्नारी वनाच्या चेकपोस्टवर घडली आहे. ही चेकपोस्ट कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर आहे. तामिळनाडूमधून केळी घेऊन पिकअप हे म्हैसूरमध्ये जात होते. रस्त्यातच बंगळुरू-तामिळनाडू राष्ट्रीय महामार्गावर हत्तीने पिकअप अडविले. त्यामधील केळी खाण्यास सुरुवात केली. ही घटना पाहून दुचाकीस्वारांनी हॉर्न वाजविण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून घाबरलेल्या हत्तीने फोटो काढणाऱ्या लोकांच्या दिशेने धाव घेतली. अशा स्थितीत रस्त्यावर दीड तास वाहतूक कोंडी झाली.