VIDEO : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर अमित शाहांनी सोडले मौन; पाहा काय म्हणाले... - अमित शाह महाराष्ट्र
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहा यांनी आपले मौन सोडले आहे. याआधी कोणत्याही राज्याला सरकार स्थापनेसाठी १८ दिवसांइतकी मुदत दिली गेली नव्हती. त्यामुळे, महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही योग्य आहे. आजही एखादा पक्ष आपले बहुमत सिद्ध करू शकत असेल, तर त्याने राज्यपालांकडे जावे, असे वक्तव्य शाह यांनी केले.