VIDEO : आठ गोळ्या घालून युवकाची हत्या; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद - अंबाला छावणी गोळीबार
अंबाला : हरियाणामध्ये आज (मंगळवार) सकाळी एक थरारक घटना समोर आली आहे. अंबाला छावणी परिसरात राहणाऱ्या जीतू नावाच्या एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या दोन गुंडांनी त्याच्यावर हल्ला करत तब्बल आठ गोळ्या झाडल्या. यानंतर ते दोन्ही गुंड फरार झाले. स्थानिकानी जीतूला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा सर्व प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत...