सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने थाटात होणार डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत - डोनाल्ड ट्रम्प
अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही वेळातच अहमदाबादच्या विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन घडवून डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले जाणार आहे.