'मुलीचा चेहरा पाहू दिला नाही', पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून जबरदस्तीने अंत्यसंस्कार - हाथरस बलात्कार प्रकरण लेटेस्ट न्यूज
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीचा सामूहिक बलात्कारानंतर खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेविरोधात देशभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. पोलिसांनी पीडित तरुणीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तर यूपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी हा आरोप फेटाळला असून पीडितेवर कुटुंबीयांच्या सहमतीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे.