25 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं दिमाखदार उद्घाटन, 'किंग खान'च्या उपस्थितीत रंगला सोहळा - MPs Nusrat Jahan and Mimi Chakraborty in KIFF 2019
कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदा 25 वे वर्ष आहे. कोलकाता येथील नेताजी इंडोर स्टेडियममध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा 'सिटी ऑफ जॉय' चा ब्रँड अँबेसडर आहे. त्यामुळे या सोहळ्यात त्याची विशेष उपस्थिती होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रीडा, राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती.