शेतीची प्रयोगशाळा करणारा तरूण शेतकरी - कर्नाटक तरूण शेतकरी शेती प्रयोग व्हिडिओ
बंगळुरू - कर्नाटकमधील एका तरुणाने परिस्थितीशी दोन हात करून आपल्या मिश्र शेतीमध्ये विविध प्रयोग केले. पारंपरिक शेती, मशरूम शेती आणि कुक्कुटपालन करता-करता त्याने शेतकऱयांसाठी 'पोल्ट्री एग इन्क्यूबेटर मशीन' तयार केले आहे. 3 हजार 500 रुपये या माफत दरात तो शेतकऱयांना हे मशीन विकतो. आतापर्यंत त्याने अशा ६० मशीन विकल्या आहेत. याशिवाय नाटी पोल्ट्री फार्मिंगचे प्रशिक्षण देखील त्याने सुरू केले. हासन जिल्ह्यातील उलुवारे गावामध्ये अनिल नावाचा हा तरूण शेतकरी आपल्या आई-वडिलांसह राहतो. आयटीआयचे शिक्षण पूर्ण करूनही त्याला नोकरी मिळाली नाही. म्हणून त्याने शेतीकडे आपला मोर्चा वळवला.